परिवर्तनाचा आगाज आम आदमी पार्टी घूग्घुस मध्ये भव्य महिला पक्षप्रवेश व पदवाटप……

0
385

परिवर्तनाचा आगाज आम आदमी पार्टी घूग्घुस मध्ये भव्य महिला पक्षप्रवेश व पदवाटप…..

 

दिनांक 08 मार्च 2022 रोजी “जागतिक महिला दिनानिमित्त” आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांच्या नेतृत्वात घूग्घुस शहरातील शिवनगर वार्ड क्रमांक 05 इथे भव्यदिव्य महिला पक्षप्रवेशा सोबतच महिला कमिटी स्थापन करून महिलांना पदभार सोपविण्यात आला. यामध्ये महिला शहर अध्यक्ष उमा तोक्कलवार, महिला उपाध्यक्ष पदी सोनम शेख, महिला सचिव पदी विपश्यना अनुप धनविजय, महिला कोषाध्यक्ष पदी अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पदी पुनम वर्मा, महिला सदस्य पदी विजया उपलेट्टी, सदस्य नसीम शेख, सदस्य धम्मदिना नायडू, सदस्य नईमा शेख, यांना पदभार सोपविण्यात आला.
आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांच्या विचारांना प्रेरित होऊन महिला सशक्तीकरण हा नारा देत महिला कमिटी स्थापन करण्यात आली.सोबतच येणाऱ्या प्रथम घूग्घुस नगरपरिषद निवडणूक लक्षात घेता महिलांना प्राधान्य देत संपूर्ण जागेवर पूर्ण ताकदीने मैदानात उतरू असा इशारा आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टी घुग्घुस अध्यक्ष अमित बोरकर यांच्याकडून देण्यात आला.
यावेळी आम आदमी पार्टी जिल्हाअध्यक्ष सुनीलजी मुसळे, जिल्हा सचिव संतोषजी दोरघंडे, जिल्हा कोषाध्यक्ष भीवराजजी सोनी, चंद्रपूर शहर महिला अध्यक्ष ऍड. सुनीताताई पाटील, चंद्रपूर शहर महिला उपाध्यक्ष जास्मिनजी शेख, चंद्रपूर शहर महिला संघटन मंत्री आरतीताई आगलावे,बल्लारपूर शहर संघटनमंत्री सरिता गुजर, बल्लारपूर शहर उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, शहर उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, प्रशांत पाझारे, अनुप धणविजय, कुलदीप पाटील, प्रशांत सेनानी, रवी शंतलावार, अभिषेक तलापेल्ली, अनुप नळे, स्वप्नील आवळे,सागर बिऱ्हाडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here