परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर स्वार हाेणारी “अर्जुमन शेख” ही एक उत्तम लेखिका – अधिवक्ता मेघा धाेटे

0
405

परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर स्वार हाेणारी “अर्जुमन शेख” ही एक उत्तम लेखिका – अधिवक्ता मेघा धाेटे

चंद्रपूर । किरण घाटे

परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर स्वार हाेणारी अर्जुमन शेख ह्या चंद्रपूर जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रातील एक उत्तम लेखिका असुन आज पावेताे त्यांचे अनेक साहित्य प्रकाशित झाले आहे तदवतच त्यांचे प्रकाशित काही साहित्यांना पुरस्कार देखिल मिळाले असल्याचे मत विदर्भातील जेष्ठ लेखिका तथा सहज सुचल ग्रुपच्या मुख्य संयाेजिका मेघा धाेटे यांनी अर्जुमन शेख यांना पाठविलेल्या एका अभिनंदन पत्रातुन व्यक्त केले. झाडी बाेली साहित्य मंडळाव्दारे आयोजित राजस्तरीय भव्य महाकाव्य लेखन स्पर्धेत अर्जुमन शेख या अंतिम पाचव्या फेरीत सर्वाेत्क्रूष्ट ठरल्या हाेत्या .त्याच निमित्ताने धाेटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. साधा व सरळ स्वभाव, परिस्थितीचे वास्तविक चिंतन ,आणि निर्भय तथा निर्भिडपणे (आपल्या) साहित्यातुन विचार मांडण्यांचे धैर्य अर्जुमन शेख यांचे लेखनीत असल्याचे नमुद करुन त्यांची साहित्य निर्मिती अव्याहतपणे सुरु असल्याचे मेघा धाेटे यांनी आपल्या पत्रात शेवटी नमुद केले आहे. दरम्यान साहित्य वर्तुळातुन अर्जुमन शेख यांचेवर सतत अभिनंदननाचा वर्षाव हाेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here