महाराष्ट्र राज्य ग्राम संवाद सरपंच संघाच्या प्रदेश कार्यालयाचा उद्घाटन सोहळा होणार संपन्न

0
705

महाराष्ट्राचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभहस्ते

ऑनलाईन झुम ॲप द्वारे- “ग्राम विकासाच्या वाटा” या विषयावर करणार मार्गदर्शन

प्रतिनिधी /सुखसागर झाडे

गडचिरोली :-    1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र ग्राम संवाद सरपंच संघाची स्थापना करण्यात आली. या संघाचा मुख्य हेतू असा आहे की, संपूर्ण महाराष्ट्रातील आजी/माजी सरपंच, उपसरपंच, व सदस्य हे एकत्रित येवुन मागर्दशन करणे, विचारांची देवाणघेवाण करने. आपले अधिकार।जनतेची काम।शासकीय योजना,व गावविकास या सर्व अडचणींवर मात करून विकास साधन्यासाठी,ग्राम सवांद,सरपंच संघ महराष्ट्र ही संघटना तयार करण्यात आली आहे. ग्राम संवाद सरपंच संघाच्या प्रदेश कार्यालयाचा उद्घाटन सोहळा दिनांक ०५ जून २०२१ रोज शनिवार ला सकाळी ११.००वा. महाराष्ट्राचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून !!ग्राम विकासाच्या वाटा!! या विषयावर अमुल्य असं मार्गदर्शन लाभणार आहे.सदरील कार्यक्रम हा कोरोणा मुळे ऑनलाईन झुम ॲप वरती होणार आहे तरी तमाम सर्व महाराष्ट्रातील जनता जनार्धनांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अजिनाथ धामणे पाटील, संस्थापक उपाध्यक्ष प्रमोदजी भगत,संस्थापक सचिव विशाल लांडगे व ग्राम संवाद सरपंच संघाचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here