भारतीय बौद्ध महासभा राजुरा तर्फे भैय्या साहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांची 111 वी जयंती निमित्त प्रबोधन चा कार्यक्रम संपन्न… 

0
217

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तर्फे भैय्या साहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांची 111 वी जयंती निमित्त प्रबोधन चा कार्यक्रम संपन्न… 

 

 

 

राजुरा, १३डिसें. : भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा कडून विविध ठिकाणी भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांची 111 वी जयंती निमित्त प्रबोधन चा कार्यक्रम पार पडला. काल दिनांक 12 तारखेला भारतीय बौद्ध महासभा राजुरा शाखा कडून लुंबिनी बुध्द विहार बामणवाडा, तक्षशिला बुध्द विहार गोवरी, सुविकस बौध्द मंडळ गोयेगाव, वरुर रोड, भेदोडा, सोंडो, लक्कडकोट या सर्व विहारांतील पदाधिकारी, धम्म बांधव भगिनी येथील नागरिक एकत्र येऊन या कार्यक्रमाला सुरुवातीला प्रथम तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भैय्या साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित करण्यात आली. यानंतर सामूहिक त्रीशरण पंचशील घेण्यात आले.

 

त्यानंतर लुंबिणी बुध्द विहार बामणवाडा मध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आला.

महापुरुषाचे कार्य व विचार यांची प्रेरणा आणि भारतातील बौद्धांच्या वर्तमान काळात कर्तव्य व जबाबदारी तसेच भैय्या साहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांच्या जीवनावर प्रमुख मार्गदर्शन अपध्यक्ष भिमराव खोब्रागडे, अध्यक्ष धर्मुजी नगराळे यांनी समाज प्रबोधन केले. तर उषाताई नगराळे, विद्या करमनकर, ममता जीवने, उज्वला वाघमारे यांनी आपले मनोगत मध्ये जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन सरचिटणीस गौतम चौरे तर आभार प्रदर्शन वैभव नळे यांनी केले. शेवटी सरणत्य घेऊन समारोप केला.

 

या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा, मिलिंद संजोग मंडळ, रमाबाई महिला मंडळ, बामणवाडा येथील प्रत्येक बौद्ध बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here