चंद्रपूरात दिव्यांग बांधवाचा स्नेहमिलन साेहळा थाटात पार पडला! यंग चांदा ब्रिगेडचा पुढाकार!

0
541

चंद्रपूरात दिव्यांग बांधवाचा स्नेहमिलन साेहळा थाटात पार पडला! यंग चांदा ब्रिगेडचा पुढाकार!

🔵चंद्रपूर🟢किरण घाटे🟣🟢 जागतिक दिव्यांग दिना निमित्त यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवाचा स्नेह मिलन साेहळा नुकताच चंद्रपूरातील पठाणपुरा मार्गावरील विद्यमान आमदार किशाेर जाेरगेवार यांचे जनसंपर्क कार्यालयात पार पडला .🟣🟢याच दिनी यंग चांदा बिग्रेडच्या काही महिला पदाधिका-यांनी ठिकठिकाणच्या दिव्यांग संस्थेला भेट देऊन दिव्यांग बांधवाना( या दिनाचे औचित्य साधुन )भरभरुन शुभेच्छा दिल्या .दरम्यान यंग चांदा ब्रिगेड च्या शहर संघटिका वंदना हातगावकर यांनी हेलन केलर व सुधा चंद्रन यांचे जीवनावर आयाेजित एका कार्यक्रमात आपल्या भाषणातुन प्रकाश ज्याेत टाकला . तर यूवती प्रमुख भाग्यश्री हांडे यांनी आपल्या अल्पश्या भाषणातुन दिव्यांग बांधवांना प्रेरणा देत त्यांना पुढील वाटचालीसाठी या वेळी शुभेच्छा दिल्या. 🔵🟣🟢 यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर नगरीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून दिव्यांग बांधवांची सर्वोतपरी मदत करणारे निलेश पाझारे ,मुन्ना खोब्रागडे , विलास वनकर , कल्पना सिन्धे , विमल काटकर , दुर्गा वैरागडे , अनिता झाडे , माधुरी बावणे , आदि उपस्थित हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here