2022 च्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ज्युनिअर महाराष्ट्र श्री ठरलेले विशाल सुरवसे यंग चांदा ब्रिगेडच्या आमदार चषक बॉडी बिल्डिंग स्पर्धेत देणार पोझ

0
624

2022 च्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ज्युनिअर महाराष्ट्र श्री ठरलेले विशाल सुरवसे यंग चांदा ब्रिगेडच्या आमदार चषक बॉडी बिल्डिंग स्पर्धेत देणार पोझ

 

2022 मध्ये झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ज्युनिअर महाराष्ट्र श्री ठरलेले विशाल सुरवसे यंग चांदा ब्रिगेड तर्फे आयोजित आमदार चषक विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डिंग अजिक्यपद स्पर्धेत पोझ देण्याकरिता उपस्थित राहणार असल्याची माहिती यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आली आहे.
यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून 19 मार्च ला आयोजित आमदार चषक विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डिंग अजिक्यपद स्पर्धेची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. या आयोजनाकरिता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जय्यत तय्यारीही सुरु आहे. जगप्रसिध्द बॉडी बिल्डर सुहास खामकर या स्पर्धेचे विशेष आकर्षण असणार आहे. त्यातच आता या स्पर्धेकरीता पंढरपूरचे विशाल सुरवसे हे ही पोझ देण्याकरीता येणार असल्याची माहिती यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आली आहे. विशाल यांनी 2022 ला झालेल्या बॉडी बिल्डिंगच्या ज्युनिअर स्पर्धेत महाराष्ट श्री चा मान मिळविला आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या आयोजनात ते पोझ देण्याकरीता येत असल्याने त्यांना पाहण्यासाठीही चंद्रपूरातील बॉडी बिल्डर उत्सुक असल्याचे दिसुन येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here