सांगोडा फाटा जयभीम पुलाच्या कडेवर ट्रक उलटला

0
445

सांगोडा फाटा जयभीम पुलाच्या कडेवर ट्रक उलटला
● सुदैवाने जीवितहानी टळली

 

कोरपना प्रतिनिधी : तालुक्यातील सांगोडा फाट्या जवळच असलेल्या जयभीम पुलाच्या कडेवर ट्रक (MH34 BG 1577) उलटला. १८ चाकी ट्रक चंद्रपूर भोयगाव मार्गाने अल्ट्राटेक सिमेंट कंपनी कडे येत होता. जवळपास ५० टनांपर्यंत असल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
या अपघातात ट्रक चालकाला काहीच दुखापत झाली नाही. निर्माणाधिन रस्त्यावरून जात असता वाहनावरून ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले यामुळे रस्त्याच्या कडेला ट्रक उलटला. ही घटना आज दुपारी ५ वाजताच्या सुमारास घडली.
सागोडा फाटा, गाडेगाव ते भोयगाव मार्गावचे काम सुरू आहे. मात्र हे काम संथगतीने सुरू असल्यामुळे या मार्गावर मागील काही दिवसात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. जयभीम पुलाच्या कडेला नाल्यात ट्रक पलटी झाला. घटनेनंतर वाहनचालकाला बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here