डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वडनेर येथे आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते हायमास्ट लाइटचे लोकार्पण

0
454

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वडनेर येथे आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते हायमास्ट लाइटचे लोकार्पण

हिंगणघाट,अनंता वायसे । वडनेर येथे 14 एप्रिल च्या पार्श्वभूमीवर मा. आमदार समीरभाऊ कुणावार तसेच मा. आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांच्या मार्गदर्शनात तसेच जि.प. सदस्य सौ. जोस्त्नाताई सुनील सरोदे यांच्या जि.प. निधीमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वडनेर येथे हायमास्ट लाइट चे लोकार्पण मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
बऱ्याच कालावधीपासून वडनेर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुख्य रस्ता असणाऱ्या आंबेडकर चौक हायमास्ट चे लोकार्पण मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते दिनांक १४/०४/२०२१ ला करण्यात आले. मा. सौ. जोशनाताई सुनील सरोदे जिल्हा परिषद सदस्य वडनेर त्यांच्या विशेष निधी अंतर्गत मंजूरीतील कामे असून वडनेर गावाच्या लौकिकांत वाढ झाली असून अतिशय प्रकाशित गावं व्हावे या करिता बरेच दिवसापासून नागरिकांची मागणी होती. यामुळे नागरिकांची बरीच सोय झालेली आहे. हा हायमास्ट सुरू झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. सदर परिसरामध्ये हायमास्ट लावल्याने गावातील परिसर प्रकाशमय झाला असून मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या कामाविषयी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे नागरिकांना अतिशय सुरक्षितपणे व सजक पणे जीवन जगण्यामध्ये या हायमास्ट लाइटचा उपयोग होणार आहे. सदरील लोकार्पण सोहळा सोशल डिस्टंसिंग ठेवून करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये मा. आमदार समीरभाऊ कुणावार, मा. वसंतराव आंबटकर माजी शिक्षण सभापती, सौ शारदाताई आंबटकर पं.स. सभापती हिंगणघाट, जि.प. सदस्या जोस्त्नाताई सरोदे, कविताताई वानखेडे सरपंच ग्रा.पं. वडनेर, मधुकर महाजन , सुनील सरोदे माजी सरपंच ग्रा.पं.वडनेर, सुरेश भगत,तुषार आंबटकर, किशोर जवादे, गजानन जारोंडे, गणेश शेळके, वैभव फुलझेले, प्रतीक जवादे, निखिल कळसकर, बंटी कुंभारे ,संजय जमानकार, अभिजित डोंगरे, इत्यादी कार्यकर्ते व गावकरी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here