चंद्रपूर- जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना अंकुश लावा ! आम आदमी पार्टीने केली मागणी !
🟣🟧🔶चंद्रपूर 🔶🟢💠किरण घाटे🟧🟡🟣
चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेते , सट्टा बाजार, कोंबड बाजार, सुगंधीत तंबाखू तसेच रेती तस्करांवर पोलीस विभागाने त्वरीत आळा घालुन संबंधित विभागाने नागरिकांना योग्य सहकार्य करावे या प्रमुख मागणीसह अन्य विषयाचे एक निवेदन आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनिल देवराव मुसळे यांनी गृहमंत्री अनिलराव देशमुख यांना नुकतेच एका भेटी दरम्यान चंद्रपूर मुक्कमी दिले .
संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यात अवैध धंद्यांना उत आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे .🛑🌀🟡🟧💠जे काम प्रशासनाला करायला हवे . ते काम लोक प्रतिनिधि करीत असल्याचे एकंदरीत दिसते. या पेक्षा दुसरी लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकते असा प्रश्न सुध्दा आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष इंजि. प्रशांत प्रभाकर येरणे यांनी उपस्थित केला.
🟣🟧🟡🟢💠दरम्यान ग्रूह मंत्री यांनी सबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन या वेळी आम आदमी पार्टीच्या एका शिष्टमंडळाला दिले .
शिष्टमंडळात सुनिल भोयर, संतोष दोरखंडे , भिवराज सोनी, अशोक आनंदे, योगेश आपटे, हिमाऊ अली,अजय डुकरे, बबन क्रिश्नपल्लिवार, दिलीप तेलंग, राजू कुडे आणि आम आदमी पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
