विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचारांची गुरूकिल्ली बाळगावी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

0
409

विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचारांची गुरूकिल्ली बाळगावी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चिमूरच्या मातीतून वरिष्ठ अधिकारी घडावे

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी सर्व सुविधायुक्त ई-लायब्ररी

चंद्रपूर दि. 27 : चिमूर हे ऐतिहासिक शहर आहे, या भूमीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या क्रांतीचा इतिहास आहे, या क्रांती भूमीतील विद्यार्थी भविष्यात आय.ए.एस. व आय.पी.एस. सारखे वरिष्ठ अधिकारी घडावे म्हणून येथे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी लवकरच सर्व सुविधायुक्त अद्यावत व वातानुकूलित ई-ग्रंथालय उभारण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले.
चिमूर येथील नेहरू विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नवीन वास्तु व व्यासपीठाचे शाळार्पण तसेच गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते आज करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी प्रकाश शंकपाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे, शिक्षणधिकरी उल्हास नरड, संस्थेचे प्राचार्य सुधीर पोहनकर तसेच संस्थेच्या संचालक मंडळातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पालक मंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले की मनात जिद्द ठेवली तर प्रतिकुल परिस्थीतीतही इच्छित ध्येय गाठता येते. विद्यार्थ्यांनी जिवनात यशस्वी होण्यासाठी सातत्यपुर्ण कष्टाने व ‘मी करू शकतो’ या सकारात्मक विचाराने पाऊल टाकावे. चांगल्या संगतीत राहून, शिक्षणाच्या बळावर देशासाठी व समाजासाठी मोठे कार्य तुमच्या हातून घडावे, अशी अपेक्षा पालकमंत्री यांनी विद्यार्थ्यांकडे व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुधीर पोहनकर यांनी केले. संचालन प्रा. शैलेश वाघधरे व किरण उमरे यांनी तर आभार पर्यवेक्षक विलास वडस्कर यांनी व्यक्त केले.
यावेळी तहसिलदार विजय सुर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. चालखुरे, भिमरावजी ठावरी, मधुकर गोडे, मनोहर कोसुरकर, तेजीराम तिवाडे, दत्तुजी शेंडे, किशोर गोटे इ. तसेच विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here