जनता महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन
प्रा. महेंद्र बेताल

चंद्रपूर । जनता महाविद्यालय चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच माजी राष्ट्रपती स्वर्गीय अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनता महाविद्यालयातील ग्रंथालय विभागात डॉ. अब्दुल कलाम यांच्या फोटोला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव बघता सामाजिक अंतर ठेवून एका लहानशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी वाचनसंस्कृती वाढली जावी आणि देशात सुयोग्य नागरिक निर्माण व्हावे, हीच डॉ. कलाम यांना योग्य श्रद्धांजली होईल असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, ग्रंथालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल प्रा. प्रशांत चहारे यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. मिलिंद जांभुळकर यांनी मानले.