महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्नने सन्मानित करा

156
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्नने सन्मानित करा
 
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची विधानसभेत मागणी
चंद्रपूर : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्यानी शिक्षणासोबतच सामाजिक क्षेत्रात अजोड कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, यासाठी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर चर्चेदरम्यान केली.
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस आजवर अनेकदा करण्यात आली. महाराष्ट्र सरकारनेही २०१६ मध्ये तशी शिफारस केंद्राकडे केली होती. मात्र आजपर्यंत याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही.
राज्यात सहा महिन्यापासून महापुरुषांचे होणारे अपमान हि बाब अतिशय गंभीर आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणत असतो. पण त्यांच्या विचारावर खरंच महाराष्ट्र चालत आहे काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आता पुढे महापुरुषांचे अपमान झाल्यास राज्यातील सर्व महिला रस्त्यावर उतरतील, असा इशारा दिला.

advt