अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे रोड सुरक्षा सप्ताह आयोजित 

0
197

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे रोड सुरक्षा सप्ताह आयोजित 

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ समाजाच्या विकासा सोबतच सुरक्षा च्या बाजूने विचार करीत असते. आजच्या या धावत्या युगामध्ये रोड अपघात वाढत आहेत हे लक्षात घेऊन माणिकगढ ने रोड सुरक्षा सप्ताह चे 11 ते 17 जानेवारी ला आयोजन केले.
याचे उदघाटन अल्ट्राटेक , माणिकगढ चे युनिट हेड श्री अतुल कन्सल यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी आणि ट्रक ड्रायव्हर्स उपस्थित होते.
या कार्यक्रमात रोड सुरक्षा नुक्कड नाटक, कविता, एड्स वरती जण जागृती, प्रथमपचार पेटी वाटप , सुरक्षा साहित्य यांचे वाटप, आग सुरक्षा मार्गदर्शन,प्रथम उपचार मार्गदर्शन नशा मुक्ती मार्गदर्शन आनी रोड शो करण्यात आला. या कार्यक्रमात बोलतांना युनिट हेड नि सर्व अधिकारी,कर्मचारी व ट्रक ड्रायव्हर्स तसेच समाजातील लोकांनी रोड सुरक्षा नियमांचे काटेकोर पणे पालन करावे असे सांगितले.
या सात दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन माणिकगढ च्या लॉजिस्टिक विभागाने केले व त्याला यशस्वी करण्याकरिता सर्व विभागाने सहभाग नोंदविला .
जवळपास पाचसे कर्मचारी, ट्रक ड्रायव्हर्स आनी इतर कर्मचारी यांनी या सप्ताहचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here