अखेर त्या दोन राईस मीलमालकावर गुन्हे दाखल – न्युज पोर्टलच्या वृत्ताची घेतली प्रशासनाने दखल

0
570

मूल (प्रतिनिधी)
मूल शहरात कोरोणाच्या संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरलेल्या मूलच्या साईकृपा राईस मील व ओम साई मील या दोन राईस मील मालकावर तहसिलदार मूल यांनी मूल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
जानाळा येथील गरीब आदिवासीवर लग्नात ५० पेक्षा अधिक वऱ्हाडी आल्यांचे कारणावरून प्रशासनाने त्यांचेवर गुन्हा दाखल केला होता. मात्र मूल शहरात तब्बल 32 मजूरांना कोरोणा संक्रमणास कारणीभूत ठरलेल्या राईस मील मालकांवर प्रशासन मेहरबान झाले असल्यांचे सविस्तर वृत्त न्युज पोर्टल ने प्रकाशीत केले होते. हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले, अनेकांनी प्रशासनाच्या भूमीकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. समाजमाध्यमातही ही बातमी चर्चेचा विषय ठरली. अखेर तहसिलदार यांनी या बातमीची दखल घेत दोनही राईस मील मालकावर गुन्हे दाखल केले असल्यांचे प्रशासनाने जाहीर केले.
राईस मील मालकांवर भादवीचे कलम 188, 269, 270 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here