विनाअनुदानित शाळा, जुनी पेन्शन लागू करणे बाबतच्या समस्यांवर पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांची अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी उद्या मुंबईत होणार सकारात्मक चर्चा

0
2098

विनाअनुदानित शाळा, जुनी पेन्शन लागू करणे बाबतच्या समस्यांवर पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांची अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी उद्या मुंबईत होणार सकारात्मक चर्चा

नागपूर, ७ डिसें. : आज पदवीधर आमदार अभिजीत वंजारी यांची नागपूर येथिल त्यांचे निवासस्थानी सिनेट सदस्य प्रा. किशोर उमाठे नागपूर, प्राचार्य नरेंद्र बोबडे चंद्रपूर, प्राचार्य रमेशराव पायपरे, यशवंत नक्कावार यांनी भेट घेऊन त्रुटी पूर्तता केलेल्या शाळाबाबत काल मंत्रालयात अतिशय सकारात्मक file चा प्रवास झाल्याबाबत चर्चा झाली. वंजारी यांनी आमदार विक्रम काळे, आमदार सुधीर तांबे यांच्या सोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा करून उद्या आपण सर्व मंत्रालयात उपस्थित राहुन त्रुटीच्या विषयाबाबत मा. अर्थमंत्री अजित पवार यांना भेटण्याचे ठरले. व 2005 पूर्वी लागलेल्या कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या संदर्भात सकारात्मक चर्चा होऊन सदर कार्य येत्या अधिवेशनामध्ये मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन अर्थमंत्री मा. अजित पवार यांच्याकडून निधी मंजूर करून घेण्याचे ठरले आहे. तसेच विना अनुदानित शाळांना अनुदान मिळण्यासाठी सतत लढा देणारे आणि मुंबई मध्ये ठाण मांडुन असलेले समन्वय संघाचे समन्वयक के. पी. पाटील यांचेशी सुद्धा भ्रमणध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. आणि उपस्थितांच्या विनंतीवरून वंजारी यांनी उद्याचे स्थानिक कार्यक्रम रद्द करून आजच सायंकाळी मुंबई करीता जाणार असल्याचे भेटीप्रसंगी सांगितले.
यावेळी प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील इतरही प्रलंबित शैक्षणिक समस्यांवर चर्चा केली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या शाळांनी मागणी केली अशा 23 प्राथमिक, माध्यमिक शाळांकरिता संगणक संच व वाटर फिल्टर मंजूर करून घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here