तहसीलदार संजय राईंचवार यांनी केल्या दाेन अवैध रेती वाहनांवर कारवाया

0
607

तहसीलदार संजय राईंचवार यांनी केल्या दाेन अवैध रेती वाहनांवर कारवाया

रेती तस्करांत उडाली खळबळ

किरण घाटे🟪⬜चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर येथील महसुल प्रशासनाने आता अवैध रेती वाहनांवर अंकुश तथा दंडात्मक कारवाई करण्यांसाठी माेहिम उघडली असुन या तालुक्याचे तहसीलदार संजय राईंचवार व त्यांचे महसुल पथकाने नुकतेच बल्हारपूर शहरा नजिकच्या परिसरात दाेन अवैध रेती वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करून वाहन मालकांकडुन २२०००० रुपये वसूल केला असल्याचे व्रूत्त आहे. दरम्यान या कारवाईतील वसुल करण्यांत आलेली रक्कम ही खजीना दाखल करण्यांत आली असुन जप्त करण्यांत आलेली ही वाहने शरद माराेती बुटले व श्रीनिवास अंचुरी यांचे मालकीची असल्याचे काल या प्रतिनिधीला तहसीलदार संजय राईंचवार यांनी बल्हारपूर मुक्कामी सांगितले .महसुल प्रशासनात इत्तर कामांचा वाढता व्याप असुन देखिल गुप्त माहितीच्या आधारे बल्हारपूर महसुल प्रशासन दिवस रात्र फिरुन अवैध रेती वाहनांवर कारवायां करीत असल्याचे द्रूष्टीक्षेपात पडत आहे .या आधी सुध्दा महसुल प्रशासनातील बल्हारपूरचे नायब तहसीलदार रमेश कुळसंगे व त्यांचे फिरत्या पथकाने अवैध रेती माफियांच्या वाहनांवर माेठ्या प्रमाणात कारवायां केल्याचे एकंदरीत दिसून येते .दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील २०रेती घाटांचे लिलाव झाले असुन जिल्हा खनी कर्म विभागाच्या पथकातील बंडु वरखेडे , अल्का खेडकर ,दिलीप माेडके हे आपल्या प्राणाची पर्वा न करता मध्यरात्री फिरुन अवैध रेती वाहन मालकांवर कारवायां करीत असल्याचे सर्वश्रुतच आहे.या पथकाने चंद्रपूर जिल्ह्यात आता पावेताे ४५पेक्षा अधिक अवैध रेती वाहनांवर जिल्हास्तरीय कार्यालयीन काम सांभाळून कारवायां केल्या आहे .बल्हारपूर महसुल विभागाचे फिरते पथक सातत्याने तालुक्यात फिरत असल्यामुळे साहजिकच अवैध रेती माफियांचे धाबे दणाणले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here