दुर्गापूर बस थांबा तसेच चर्च गेट दुर्गापूर येथे प्रवासी निवारा उभारण्यात यावा – संदीप देठेकर यांची मागणी

0
561

दुर्गापूर बस थांबा तसेच चर्च गेट दुर्गापूर येथे प्रवासी निवारा उभारण्यात यावा – संदीप देठेकर यांची मागणी

चंद्रपूर/प्रतिनिधी : कधी ऊन पाण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रवास करणाऱ्या वृद्धांना बसण्यासाठी महिला व विद्यार्थ्यांना कुठेही उभे राहण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाच्या वतीने गावोगावी किंवा बस थांबा च्या ठिकाणी प्रवासी निवाऱ्याची सोया करण्यात आली आहे. परंतु चंद्रपूर – ताडोबा मार्गावरील दुर्गापूर येथे एस टी बस थांब्यावर प्रवासी निवारा नसल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. प्रवाशांना नाहक उन्हात पावसात उभे राहून बस ची वाट पाहावी लागत आहे. बस थांब्याच्या ठिकाणी चाय टपरी, फुटपाथ वरील छोटी हॉटेल , पाणठेले इत्यादी ठिकाणी महिला व विद्यार्थ्यांना आसरा घ्यावा लागतो आहे.

 

दुर्गापूर परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी एस टी ने या मार्गावर बऱ्याच वर्षांपासून बस थांबा सुरू केलेला आहे. तसेच अंदाजे 20 ते 25 वर्षे पूर्वी त्या ठिकानात प्रवासी निवारा बांधण्यात आला होता. परंतु सध्या परिस्थितीत दोन्ही ठिकाणचे प्रवासी निवारा पूर्णतः उध्वस्त झालेले आहेत.

 

दुर्गापूर तसेच चर्च गेट दुर्गापूर थांब्यावरून दररोज आंचलेश्वर गेट ते उर्जानागर शहर बस सेवा प्रत्येकी एक ते दीड तासाला सुरूच असते. चंद्रपूर- दुर्गापूर- चोरगाव बस सेवा चंद्रपूर- दुर्गापूर- चांदनखेड- भद्रावती बस सेवा, चंद्रपूर- दुर्गापूर- ताडोबा- चिमूर बस सेवा हे नियमित दुर्गापूर बस थांबा वरून थांबून जातात. रोज शेकडो प्रवासी येथून ये जा करीत असतात. परंतु प्रवाशांच्या सुविधेसाठी या बस थांबा वर साधे प्रवासी निवारा बनविण्यात आलेला नाही. प्रवाशांना बस ची वाट बघत तासनतास ऊन पावसात उभे राहावे लागत आहे.

 

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर कडून हा मार्ग सिमेंट काँक्रिट चे आणि रुंदीकरण करून दुहेरी मार्ग तयार करण्यात आले आहे. परंतु दुर्गापूर बस थांबा तसेच चर्च गेट दुर्गापूर येथील बस थांबा च्या ठिकाणी प्रवासी निवारा अद्याप तयार करण्यात आलेला नाही. तरी या दोन्ही ठिकाणी लवकरात लवकर प्रवासी निवारा तयार करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन विभाग नियंत्रक रा.प.चंद्रपूर यांना देण्यात आले.

 

सदर निवेदन अखिल भारतीय समता सैनिक दल चंद्रपूर चे सदस्य तसेच युरो चे संस्थापक अध्यक्ष संदीप देठेकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते दीपक भोंडेकर, प्रयास चिडे, मधुर मेश्राम, इम्तियाज अन्सारी, प्रिणेश साव, पंकज वाघमारे, निखिल खंदारे, सुरेश वाघमारे, सुनील मोहोदेकर, प्रदीप शिवणकर, संतोष भोंडेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here