उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल दुबाले यांच्या निवासस्थानी दिली भेट

0
303

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल दुबाले यांच्या निवासस्थानी दिली भेट

मेहनत केली की यश येते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल दुबाले यांच्या घरी भेट देऊन पंखात बळ दिले. पोलिसांसाठी करत असलेल्या कामाची ही पावती आहे. फडणवीस हे बीड दौऱ्यवर होते. पूर्ण राज्याची जिम्मेदारी असणाऱ्या व्यक्तीने वेळात वेळ काढून राहुल दुबाले यांच्या निवासस्थानी भेट दिली. महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारी यांची छाती घरवाले पोलिसांसाठी करत असलेल्या प्रामाणिक कामाची ही पावती आहे.

धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब आपण माझ्या घरी येऊन मला जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद कायम चांगल्या गोष्टी व शेवटच्या पोलीस कर्मचारी यांची मदत कशी करता येईल याच्यासाठी मी हा कायम तेवत ठेवेल. ना मंत्र्यांचे पोरग नामदाराचा भाऊ एक सर्वसामान्य कुटुंबातील पोलिसाच्या पोराच्या घरी आपण आलात ही गोष्ट अतुलनीय आहे. आपण करत असलेल्या संघर्षाला आपल्यामुळे कुठेतरी यश आले. हे याच्यातून सिद्ध होते. आपण माझ्या घरी येऊन मला व माझ्या परिवाराला आशीर्वाद दिला. हे मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. आपल्या सोबत सहकार मंत्री अतुल सावे, माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व असंख्य पोलीस परिवार या क्षणाचा साक्षीदार होता. मी आपले शब्दात आभार मानू शकत नाही धन्यवाद. असे मनोगत राहुल दुबाले यांनी याक्षणी व्यक्त केले.

मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जिल्हा चंद्रपूर कडून आभार व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here