माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या मागणीला यश

0
238

माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या मागणीला यश

बी.एड तसेच ज्या कोर्सेसची परीक्षा झाली नाही त्याची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी-माजी आमदार प्रा.-राजु तिमांडे

हिंगणघाट (अनंता वायसे)
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे सर्व शाळा कॉलेजेस बंद करण्याचे आदेश असतानासुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे 22 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला. माजी बी.एडच्या विद्यार्थ्यांची कोविड-१९ च्या कालावधीत पहिल्या सेमची परीक्षा झाली असून पुन्हा परीक्षा न घेता त्या परीक्षेची चाचणी करून तो निकाल लावण्यात यावा व विद्यापीठाद्वारे ती परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे सह बी.एडच्या विद्यार्थ्यांची शिक्षण मंत्री उदय सामंत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे कुलगुरू यांना उपविभागीय अधिकारी मार्फत करण्यात आली होती.
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे सह विद्यार्थ्यांच्या त्या मागणीला यश आले असून त्या मागणीचा पाठपुरावा शिक्षणमंत्री उदय सामंत व आमदार अभिजित वंजारी यांनी केला.त्या परीक्षा रद्द करण्यात आल्या परंतु बी.एडच्या माजी विधार्थयांचा प्रश्ण अद्याप निकाली लागला नाही.त्या बद्दल पाठपुरावा करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही.कोरोनाच्या काळात विध्यार्थीच्या जीवनाशी खेळ केला जात आहे. 22 फेब्रुवारीला एक पेपर घेण्यात आला नंतर विद्यापीठाला चुक लक्षात आली परंतु कोणतीही पूर्व सूचना न देता विध्यार्थी 24 तारखेला परीक्षाकेंद्रावर पोहोचल्यावर परीक्षा रद्द झाल्याची सुचना देण्यात आली त्यामुळे लांब अंतरावरून आलेल्या विध्यार्थीना आवागमनाचा नाहक त्रास सहन करावा लागला.
नव्याने बी.एडसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची २०१९ पासुन परीक्षा झाली नाही  त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली नाही त्या सर्व कोर्सेसची परीक्षा नागपुर विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतींनी लावकार्यत लवकर घेण्यात यावी अशी मागणी सुद्धा माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here