अमरावती विद्यापीठ सिनेटवर शिक्षण मंच अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉ ओमप्रकाश मुंदे आणि प्राचार्य डॉ अनिलकुमार राठोड यांचे स्टँडिंग कमिटीद्वारा नामनिर्देशन

0
203

अमरावती विद्यापीठ सिनेटवर शिक्षण मंच अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉ ओमप्रकाश मुंदे आणि प्राचार्य डॉ अनिलकुमार राठोड यांचे स्टँडिंग कमिटीद्वारा नामनिर्देशन

विविध अभ्यासमंडळांवर शिक्षण मंचचे तीन सदस्य नमित

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती : महाराष्ट्र विद्यापीठ कायदा ७०(१) नुसार स्थायी समितीने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती च्या रिक्त सिनेट जागेवर व अभ्यासमंडळावर नमीत करून भरण्यात आल्या. यामध्ये शिक्षणमंचचे अमरावती शहर अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश बबनराव मुंदे, ना. रा. महाविद्यालय, बडनेरा यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवर विद्यापीठ कायद्याच्या कलम २८ (२) (r) तर प्राचार्य डॉ. अनिलकुमार लालसिंग राठोड, जी. बी, कला व वाणिज्य महाविद्यालय, शेगाव यांची सिनेटमध्ये २८(२) (०) अंतर्गत (DT/NT Category) नामनिर्देशन करण्यात आले.

तसेच प्राणीशास्त्र या अभ्यास मंडळावर डॉ. मीना त्रंबक निकम यांना नमीत करण्यात आले. कॉम्पुटर सायन्स या अभ्यासमंडळावर डॉ. हेमंत एस. महल्ले, प्राचार्य, श्री. विठ्ठल रुख्मिणी महाविद्यालय, सावना यांना नामीत करण्यात आले. डॉ. नितीन देशमुख, श्री. वसंतराव नाईक महाविद्यालय, धारणी यांना इंग्रजीच्या अभ्यास मंडळावर नमीत करण्यात आले आहे.

सर्व प्राधिकारणांवर नमित सदस्यांचे शिक्षण मंचचे अध्यक्ष प्रा. प्रदीप खेडकर व डॉ. सुनिल आखरे, महामंत्री यांनी अभिनंदन केले. या निवडीबद्दल शिक्षण मंच परिवाराकडून सर्व सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here