आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने हर्निया, हायड्रोसील आणि मोतिया बिंदु आजारावर मोफत शस्त्रक्रिया

83

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने हर्निया, हायड्रोसील आणि मोतिया बिंदु आजारावर मोफत शस्त्रक्रिया

उद्या २ मार्च ला आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने हर्निया, हायड्रोसील आणि मोतिया बिंदु या आजांरावर सावंगी येथील आर्चाय विनोभा भावे रुग्णालयात निशुल्क उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. तरी सदर आजाराने त्रस्त रुग्णांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे या दिशेने प्रयत्न केल्या जात असुन विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन केल्या जात आहे. दरम्याण उद्या २ मार्च ला हर्निया, हायड्रोसील आणि मोतिया बिंदु आजारावर मोफत शस्त्रक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने केल्या जाणार आहे. यात रुग्णांच्या जाण्या येण्यासह राहण्याची सर्व व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे. यासाठी सदर आजाराने त्रस्त्र असलेल्या नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

advt