आनंद बुद्ध विहाराच्या सभागृहामध्ये बौद्ध समाज मंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
411

आनंद बुद्ध विहाराच्या सभागृहामध्ये बौद्ध समाज मंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चंद्रपूर : प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिना प्रित्यर्थ आनंद बुद्ध विहाराच्या सभागृहामध्ये बौद्ध समाज मंडळाच्यावतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. कोमल खोब्रागडे यांनी उपस्थितांना प.पूज्य.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेच्या उत्थाना करीता अष्टपैलुत्वाने केलेल्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे मार्गदर्शक म्हणून लाभलेले धम्मप्रचारक प्रा.रवी कांबळे यांनी प.पूज्य.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिले, त्यासर्वांन बद्दल सुद्धा महापरिनिर्वाण दिनी आदरांजली अर्पित करीत आधुनिक बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतामध्ये समानता स्थापन करण्याकरिता केलेल्या अथक प्रयत्नाबद्दल मार्गदर्शन करीत आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजि. तथागत पेटकर यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here