जळगाव जिल्हा प्रतिनिधी विशाल सुरवाडे
जळगाव येथील अमळनेर – तालुक्यातील चौबारी ग्रामस्थांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलेले आहे. चौबारीत समस्यांचा अंबार असून स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने गावकरी नेहमीच साथ आजारांच्या विळख्यात असतात. आधीच करोनाने थैमान घातले आहे त्यात पावसाळा सुरू असल्याने विविध साथ आजारांचा धोका बळावला असतानाही गावात ठिकठिकाणी असलेले उकीरडे हटविण्याबाबत कोणताच निर्णय घेतला जात नाही. तसेच चौबारी गावाच्या मधोमध जिल्हामार्ग जात असल्याने वर्दळ आहे मात्र थेट रस्त्यावरच गुरे बांधण्यात येत असल्याने अपघातांचा धोकाही बळावला असतानाही संबंधित जबाबदार याकडे लक्ष पुरवायला तयार नाहीत. ग्रापपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. यासंदर्भात चौबारीच्या पोलीसपाटील भावना पाटील यांच्याकडून गटविकास अधिकार्यांना निवेदन सोपिवण्यात आलेले आहे. देण्यात आले आहे.

या निवेदनात नमूद आहे, की पावसाळयाचे दिवस असून चौबारी गावातून जिल्हा महामार्ग क्रमांक 65 जातो. या रस्त्यावर गुरे बांधली जातात तसेच रस्त्याच्या कडेलाच नागरी वसाहतीत उकिरडेही आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून अपघातांचा धोकाही बळावला आहे. याबाबत आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन स्तरावरुन कोणीही एक शब्द बोलण्यास तयार नाही. अगोदरच गावात करोनाचे रुग्ण आढळले आहेत त्यात विविध साथ आजारांचा धोकाही वाढलेला आहे. ग्रामसेवक गावात कधी येतो व जातो याचा थागपत्ता नसतो. अनेक शेतकरी पीककर्ज व विविध कामांसाठी ग्रामसेवकाची वाट पाहत ताटकडत असतात. मात्र, ते कधी भेटतात तर कधी भेटत नाहीत त्यामुळे लोकांना दिवसभर त्यांची वाट पाहून काम न करताच परतावे लागते. तर मारवड आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी गावात फिरकत नाहीत. गावात स्वच्छतेसोबतच ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. आपण बीडीओ असतानाही करोना योद्धा म्हणून आघाडी घेतली आहे. गावोगावात तुम्ही याबाबत जागर करत आहात मात्र चौबारी गाव खितपत पडले असून आपण या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत जबाबदारांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून चौबारी ग्रामस्थांना दिलासा द्यावा असे भावना पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.