23 तारखेला चंद्रपुरात पहिले विभागीय राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विभागीय संमेलन

0
457

23 तारखेला चंद्रपुरात पहिले विभागीय राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विभागीय संमेलन

 

 

चंद्रपूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विभागीय पत्रकार संमेलन येत्या २३ जानेवारीला चंद्रपूर येथील मृणालगिरी सभागृह (जयंत टॉकीज जवळ) येथे होऊ घातले असून या कार्यक्रमात परिचर्चा, मान्यवरांचा गौरव समारंभ, कवी संमेलन असा भरगच्च कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.

कोरोना नियमांचे पालन करून संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाचे उदघाटन दुपारी १ वाजता महाराष्ट्र अध्यक्ष राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तथा संपादक-दैनिक महाभारत, महाराष्ट्र चे मा. विजयकुमार वहाळ यांचे हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. एड. राजेश सिंग, विदर्भ कायदेशीर सल्लागार राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ हे भूषवतील.

प्रमुख उपस्थिती म्हणून विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर, निलेश ठाकरे, विदर्भ संघटक, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ,
मिलिंद नरांजे, विदर्भ उपाध्यक्ष राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, मा. सुजय वाघमारे, संपर्क प्रमुख तथा चंद्रपूर जिल्हा प्रभारी यांची असेल. कार्यक्रमाचे संचालन सीमा भासारकर या करतील.

दुपारी २ वाजता कविसंमेलन कवी संमेलन होणार असून “कविता विद्रोहाच्या, वास्तवाच्या, परिवर्तनाच्या….” असा कवी संमेलनाचा विषय आहे. कवी संमेलनाच्या अध्यक्षा- एड. योगिता रायपुरे तर सूत्रसंचालन नरेंद्र सोनारकर हे करणार असून श्रुती दूर्गे, अभिजित ठमके, सिमा भसारकर, सोनाली कवाडे, विजय भसारकर, ईश्वर रामदास सोयाम, मृणाल कांबळे, अस्मिता वाघमारे, अतुल येरगुडे, सविता भोयर, हेमा लांजेकर, तुळसाबाई खडसे, सरोज हिवरे, विशाल शेंडे, चित्रलेखा धंदरे, मेघा धोट, मयुरी आलाम या कवींचा समावेश असणार आहे. कवी संमेलनाचे आभार प्रदर्शन मृणाल कांबळे या करतील.

दुपारी ४ वाजता गौरव समारंभ, सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने होईल. अशी माहिती पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हाप्रसिद्धी प्रमुखांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here