अष्टपैलू कलावंत मुर्लिधर बाेरसरे काळाच्या पडद्याआड! नाट्य कलावंत सुरेश कामडीची भावपूर्ण श्रध्दांजली!

0
633

अष्टपैलू कलावंत मुर्लिधर बाेरसरे काळाच्या पडद्याआड! नाट्य कलावंत सुरेश कामडीची भावपूर्ण श्रध्दांजली! नेरी (चंद्रपूर), किरण घाटे : प्रित जमली चाळातुन या नाट्य प्रयाेगातुन रसिकांची मने जिंकणारा एक अष्ट पैलु कलावंत मुर्लिधर मंगरुळजी बाेरसरे यांची नुकतीच प्राणज्याेत मालवली. नेरी माेटेगांव व चिमूर येथील अनेकांशी दिवंगत मुर्लीधर बाेरसरे यांचे आपुलकीचे जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध हाेते .ते माेटेगांव येथील लाेकविद्यालयात शिपाई पदावर कार्यरत हाेते. रंगभूमी वरील एक सच्चा अष्टपैलू कलावंत मी माझ्या आयुष्यात गमावलाअश्या शब्दात दुखवटा व्यक्त करुन चिमूर नेरीचे नाट्य कलावंत सुरेश कामडी यांनी आपल्या दिवंगत मित्रास भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here