ओबीसींच्या संवैधानिक न्याय मागण्याकरीता तहसील कार्यालयासमोर निदर्शने. – विविध मागण्यांचे तहसीलदार यांना दिले निवेदन.

0
437

ओबीसींच्या संवैधानिक न्याय मागण्याकरीता तहसील कार्यालयासमोर निदर्शने.
– विविध मागण्यांचे तहसीलदार यांना दिले निवेदन.

राजुरा २४ जुन

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अनेकदा मोर्चे ,आंदोलने ,निवेदने ,निदर्शने आणि विविध प्रकारचे लक्षवेधी आंदोलने करूनही केंद्र सरकार ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करीत नसून या उलट ओबीसींचे विविध क्षेत्रातील आरक्षण कमी करण्याचा कट सरकारने रचला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण सध्या रद्द झाले आहे. राज्य सरकारने आयोग नेमून इम्पेरीकल डाटा सुप्रीम कोर्टात त्वरित मांडावा ज्यामुळे ओबीसींचे आरक्षण पूर्ववत होईल , महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील कमी झालेले आरक्षण पूर्ववत करावे व ओबीसींच्या इतर प्रलंबित मागण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कडे या मागण्या मंजूर करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे ,महासचिव सचिन राजूरकर ,राष्ट्रीय समन्वयक डॉ.अशोक जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात राज्यभर जिल्हाकचेरी व तहसील कार्यालया समोर निदर्शने आयोजित करण्यात आले.
राजुरा तहसील कार्यालय समोर आयोजित निदर्शने कार्यक्रमात अँड.वामनराव चटप माजी आमदार ,भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, अँड.मारोती कुरवटकर , राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे तालुका अध्यक्ष संतोष देरकर ,महासचिव बादल बेले, कार्याध्यक्ष कपिल इद्दे ,छोटूलाल सोमलकर ,संदीप आदे, नागेश उरकुडे ,बळवंत ठाकरे ,नितीन जयपूरकर ,सुजीत कावळे , राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी -अधिकारी महासंघ शाखा राजुरा चे अध्यक्ष सुभाष अडवे , सरचिटणीस किसन बावने ,कार्याध्यक्ष भास्कर वाटेकर , कोषाध्यक्ष साईनाथ परसुटकर , सचिव रामरतण चापले ,सहसचीव श्रीकृष्ण वडस्कर , आदींसह विविध राजकीय पक्षातील व ओबीसी समाजातील शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार हरिश गाडे यांना ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले. प्रास्तविक किसन बावणे यांनी तर आभार डी.आर.गौरकर यांनी मानले. या निदर्शने यशस्वीतेकरिता दिलीप गीरसावळे, एस. कीनगे ,सुधीर झाडे ,श्यामसुंदर बोबडे ,रामकीसन चीडे ,दिलीप नीमकर ,प्रदीप पायघण ,एस.भोयर ,वामन साळवे,सुनील बोढे ,सुधीर ढवस ,मधुकर मटाले ,अभय बोबाटे ,प्रदीप वासाडे ,संदीप लोनगाडगे ,एन.डाखरे ,बी.पहानपटे, एस.बोबडे , प्रा. प्रफुल्ल शेंडे, केतन जूनघरे,उत्पल गोरे आदींसह राष्ट्रीय ओबीसी महासंघच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here