युवकावर चाकूने हल्ला, वरूर रोड येथील घटना
प्रतिनिधी अमोल राऊत

राजुरा । तालुक्यातील वरूर रोड येथे सुरज शामसुंदर निरांजने या युवकावर येथीलच स्थानिक युवकाने चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना 7 तारखेला रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. आरोपीवर गुन्हा दाखल करन्यात आला असून जखमीवर शासकीय रुग्णालय राजुरा येथे उपचार सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की, स्थानिक जि.प. शाळेच्या आवारात सुरज शामसुंदर निरांजने आपल्या मित्रांसोबत बसून असतांना तिथे आरोपी ईश्वर शिन्नु तोकलवार (20) हा आला. त्याने जखमीच्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ केली असता जखमींने आरोपीस जातीवाचक शिवीगाळ करू नकोस असे म्हणले असता आरोपीने सूरज यांचेवर जवळ असलेल्या चाकूने मानेवर वार केला. यात सुरज यांना मानेवर व मानेच्या खाली पाठीवर गंभीर जखम झाली. वेळीच मित्रमंडळींनी जखमीला राजुरा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
आरोपीवर ऍक्ट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत. एपीआय साखरे यांनी मोका चौकशी करून पंचनामा केला. राजूऱ्याचे ठाणेदार नरेंद्र कोसुरकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय साखरे पुढील तपास करत आहेत.