चंद्रपूरात झाला माधुरी दीपक कटकाेजवारचा गाैरव

0
713

चंद्रपूरात झाला माधुरी दीपक कटकाेजवारचा गाैरव

सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या संयाेजिका अँड. मेघा धाेटे, मायाताई काेसरे, प्रभा अगडेंसह अनेकांनी केले माधुरीचे अभिनंदन
चंद्रपूर । किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी
विदर्भातील गडचिरोली गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत येत असलेल्या व अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या सरदार पटेल महाविद्यालयात आज विद्यापीठाच्या गुणवंत यादीत झळकणांऱ्या विद्यार्थांचा गौरव सोहळा पदवी प्रमाणपत्र तथा पुरस्कार निधी कार्यक्रम अत्यंत थाटात व उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या अध्यक्षा श्रीमती सुधाताई शांतारामजी पोटदुखे होत्या तर विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांचे सह प्रा. मनीष उत्तरवार, मंगेश इंदापवार, शामसुंदर धोपटे, माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, महाविद्यालयाचे सचिव प्रशांत पोटदुखे, प्राचार्य डॉ. राजेश इंगोले, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, प्रा. डॉ. पंकज मोहरीर, प्रा. डॉ. सुनीता बनसोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन यात तृतीय मेरिट आल्या बद्दल विद्यापीठ व महाविद्यालयाकडून माधुरी दीपक कटकोजवार हीचा पदवी सोबत प्रमाणपत्र व पुरस्कार निधी देऊन गौरव या समारंभात करण्यात आला. सदरहु पार पडलेल्या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.
माधुरीने प्राप्त केलेल्या या घवघवीत यशाचे महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे, सहसंयाेजिका मायाताई काेसरे, साेशल मिडीयाच्या प्रभा अगडे, नागपूरच्या जेष्ठ लेखिका गीता बाेरडकर, चंद्रपूरच्या सुविधा बांबाेडे, कु. सायली टाेपकर, कु. प्रतीक्षा झाडे, कु. रसिका ढाेणे, मुंबईच्या रजनी रणदिवे, प्रतिमा नंदेश्वर, सुवर्णा कुळमेथे, कविता चाफले, प्रतिभा चट्टे, श्रध्दा हिवरे, पुनम रामटेके, धनश्री शेडे, हेमलता डफ आंदिनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here