क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात उत्साहात साजरी

0
493

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात उत्साहात साजरी

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जयंती तथा विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

चामोर्शी, सुखसागर झाडे
शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय चामोर्शी येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत आज ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पन व दीपप्रज्वलन करीत विनम्र अभिवादन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्यावर विद्यार्थीनींने तसेच उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ब्हि.व्ही धोटे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. निनाद देठेकर, प्रा. पि. कोटांगले, प्रा. एस. झाडे. प्रा. सोनी आभारे, प्रा.वसाके, व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थ्यांनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन हर्षा पाल यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. निनाद देठेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्वानी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here