रेतीतस्करांनी लावली पिपरी घाटाची वाट!

0
761

चंद्रपूर :-चंद्रपूर तालुक्यातुन वाहणाऱ्या वर्धा नदीची लुटमार हा विषय नविन नाही. मात्र यंदा अवैध करणारे रेती तस्करी भागीदार बनल्याने खनीज संपत्तीचे चित्रहरण अधिकार्यांचे डोळ्यासमोर सुरू असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. चंद्रपूर तालुक्यात वर्धानदीच्या पात्रात असुन या घाटामध्ये रेतीतस्करीने कळस गाठला आहे. दिवस रात्र माल उपसा करून, अधिकारीऱ्यांशी सेटींग करुन विना वाहतूक परवाना रेतीतस्करीचे व चित्र बघायला मिळत असल्याची पर्यावरण प्रेमींची केविलवाणी ओरडणार सुरू आहे.या घाटावर वर्धा नदीची इभ्रत वाचविण्याची जबाबदारी अधिकारी व स्थानिक महसूल विभागाचे कर्मचारी डोळ्यावर पट्टी बांधून गप बसण्यामागे मोठी हप्तेखोरी झाली हे झालेले रेती उपसा बघुन लक्षात भरते.राष्ट्रीय खनिज संपत्तीची पार वाट लावण्यात आली आहे. देशद्रोही कृत्य करणाऱ्यांना पैसे घेऊन पाठबळ देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी झालेल्या उपसा मोजावा अशी मागणी होऊ लागली आहे. दिवस रात्र रेतीचा उपसा करून गत दोन महिन्यांत रेती घाटाचा कितीतरी पटीने अधिक रेतीचा उपसा केला आहे. रेतीची वाहतूक विना परवाना सुरु आहे. चंद्रपूर तालुक्यातील माल जो चोरीने बाहेर जिल्हायात जायचा त्याला चंद्रपूर च्या नव्या उपविभागीय अधिकारी यांनी चाप लावला. सदर काम चंद्रपूर तालुक्यातील महसूल कर्मचारी व अधिकारी यांना का जमले नाही? याचि शहानिशा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करावी अशी मागणी पुढे येत आहे.चंद्रपूर तालुक्यातील पिपरी रेती घाटातून आता स्थानिक ट्रॅक्टर चालकांना हाताशी धरून सायंकाळी ७नंतर व सकाळी ५ चे आधी रेती चोरीचा धंदा सुरू आहे. राष्ट्रिय खनीज संपत्तीचे वाट लावणे हा देशद्रोह असल्याचे व या चोरांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे कुत्य शाशनासी बेईमानीचे असल्याचे जाणकार बोलतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here