आदिवासी बांधवांना खावटी वाटप योजनेअंतर्गत वेलतुर तुकूम येथे सरपंच यांचे हस्ते अन्नधान्य किट वाटप

0
503

आदिवासी बांधवांना खावटी वाटप योजनेअंतर्गत वेलतुर तुकूम येथे सरपंच यांचे हस्ते अन्नधान्य किट वाटप

चामोर्शी (गडचिरोली), सुखसागर झाडे

आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत २०१३ पासून बंद असलेली खावटी वाटप योजना ९ सप्टेंबर २०२० पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी आधी कर्ज स्वरूपात असलेली ही योजना आता अनुदान स्वरूपात सुरू करण्यात आली आहे.

 

 

आज वेलतुर तुकूम येथे संध्या संतोष नायबनकर सरपंच यांच्या हस्ते अन्नधान्य किटचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी २००० रुपये थेट बॅंक खात्यात अनुदान स्वरूपात तर २००० रुपयांचे अन्नधान्य किट असे एकूण ४००० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.

 

 

या योजनेमुळे गोरगरीब आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला. यावेळी उपसरपंच दिगांबर धानोरकर ग्रामपंचायत वेलतुर तुकूम येथील सर्व सदस्य तथा मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here