संविधान दिन व धम्म प्रवचन मालिका तथा सत्कार समारोप संपन्न

0
230

संविधान दिन व धम्म प्रवचन मालिका तथा सत्कार समारोप संपन्न

भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा वतीने संविधान दिन व धम्म प्रवचन मालिका तथा सत्कार समारोप संपन्न झाला. दि. 26/11/2023 रोज सकाळी 11.30 वाजता संविधान चौक राजुरा समोरील महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भारतीय बौद्ध महासभेतील पदाधिकारी तर्फे मानवंदना देण्यात आली. त्रिशरण, पंचशील व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन आयु.नी. गीताताई पथाडे व किरण ताई खैरे यांनी वाचन केले. त्यानतंर संविधान चौक ते बुध्द भूमी पर्यंत दोन दोन च्या रांगेने शांततेत रॅली काढण्यात आली. विश्राम गृह जवळ छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
त्यानंतर दुपारी १ वाजता यंग मेन्स बुदिस्ट्ट वेलफेअर असोशीएशयन राजुरा येथील बुध्द विहार येथे संविधान दिना निमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्व प्रथम तथागत गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार मेणबत्ती, अगरबती लावून दीप प्रज्वलित करण्यात आले. यानंतर सामूहिक त्रिशरण, पंचशील व संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन आयु.नी. रत्नमाला मावलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आयु. भिमराव खोब्रागडे उपाध्यक्ष यांनी संविधान वर अध्यक्षीय भाषण केले तर सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ पथाडे यांनी उद्घाघाटन करून डॉ. बाबासाहेब यांनी लिहिलेले संविधान बद्दल भारतीय संविधान आणि आजची वर्तमान स्थिती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
आयु.नी. समताताई लभाने केंद्रीय शिक्षिका बल्लारपूर यांनी तर राजुरा तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्यामध्ये रमाई जयंती, समाज प्रबोधन, दोन उपासीका शिबीर बामणवाडा, राजुरा ला सतत विस दिवस शिबिराला मार्गदर्शन केलेले आहे.
आज सुध्दा सांविधाना बद्द्ल बोलतांना त्या म्हणाल्या की, लग्न झाल्या वर दोन भांवाना एका घरात राहणे अवघड जाते. परंतु भारताचे संविधान 29 राज्य, 10 धर्म, 7500 जाती, 3000 भाषा, 45 कोटी कुटुंब, 136 कोटी लोकसंख्या यांना 73 वर्षापासुन सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र बांधून ठेवनारे हे अनमोल संविधान आहे. सांविधाना वर आज भारत देश चालत आहे. आज जगामध्ये भारतातील संविधान महान समजल्या जाते. अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले. प्रा. विठ्ठल आत्राम शिवाजी कालेज राजुरा, आद. किसन बावणे शिक्षक जिल्हा परिषद जिवती यांनी सुद्धा संविधान वर सविस्तर मार्गदर्शन केले. आयु.नी. गीताताई पथाडे माजी उपाध्यक्ष नगर परिषद राजुरा, आयु.नी. किरणताई खैरे
शहर कोष्याध्यक्ष, सुजाताताई नले सरचिटणीस, अशोक दुबे अध्यक्ष ग्राम शाखा रामपुर, मुरलीधर ताकसांडे उपाध्यक्ष, प्रा.दिनेश घागरगुंडे उपाध्यक्ष, बंडू वनकर संघटक वरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. या पूर्वी सतत चार महिने वर्षावास प्रवचन मालिका घेण्यात आली. त्यानंतर समारोपीय कार्यक्रमात राजुरा तालुका मधील प्रत्येक विहार मधील प्रा. दिनेश घागरगुंडे, राजहंस पिपरे, धनराज दुर्योधन, किरणताई खैरे ,निर्मलाताई खैरकर यांनी आपले थोडक्यात मनोगत वक्त केले. त्यानतंर भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्यामध्ये बौध्द धम्माचा प्रचार प्रसार करण्याकरिता मदत केले. तसेच पत्रकार अमोल राऊत, चंदन जगताप, हनिषा दुधे आणि समाजामध्ये सामाजिक चळवळी मधील कार्यकर्ता ना सन्मान चिन्ह देऊन भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्याच्या पदाधिकारी कडून करण्यात आला. विशेष उपस्थित मध्ये आयु. धर्मुजी नगराळे अध्यक्ष, गौतम चौरे सरचिटणीस, गौतम देवगडे कोष्याध्यक्ष, प्रभाकर लोखंडे, समता सैनिक दल चे सैनिक वैभव नले, यश वाघमारे, साक्षी नले, शुभम नगराळे व इतर पाच सहा सैनिक यांनी चांगली सेवा दिली व उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत गीत आयु. अशोक दुबे अध्यक्ष ग्राम शाखा रामपुर यांनी केले तर मनोगत नंतर आयु. विजय खैरकर यांनी संविधान गीत सुंदर आवाजा मध्ये गायले. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. पुरुषोत्तम वनकर अध्यक्ष ग्राम शाखा गोयेगाव यांनी केले आणि उत्कृष्ट संचालन आयु. इंजी. राहुल भगत अध्यक्ष ग्राम शाखा गोवरी यानी केले तर आभार प्रदर्शन आयु.नी. वंदनाताई देवगडे यांनी मानले. शेवटी सरण्यत घेण्यात आले. आद. सुरेश मेश्राम सामाजिक कार्यकर्ता च्या मुलगा सुधीर मेश्राम व महेश्ररी मेश्राम यांच्या मुलांच्या नामकरण विधी करून मुलाचे नाव सुवेन ठेवण्यात आले. यांनी मसाला भात भोजन दान दिले. या कार्यक्रमाला राजुरा तालुक्यातील बहुसंख्य संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here