भंगाराम तळोधी येथे मोफत भव्य रोग निदान, औषधी वितरण व अवयव दान विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
● पोलीस प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम
गोंडपिपरी : पोलीस स्टेशन गोंडपिपरी व उप पोलीस स्टेशन धाबा यांच्या संयुक्त विद्यमाने 30 नोव्हेंबरला भंगाराम तळोधी येथे मोफत भव्य रोग निदान, औषधी वितरण व अवयव दान विषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
सदर शिबिराचे प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच मूल चे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार मंचावर आसनस्थ होते. यावेळी मंचावर गोंडपिपरीचे तहसिलदार के डी मेश्राम, गोंडपिपरीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप बाम्बोडे, डॉ. घनश्याम पुसनाके, डॉ. श्रुतिका पावडे, पोलीस स्टेशन गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू, उप पोलीस स्टेशन धाबाचे ठाणेदार सुशील धोकटे व तज्ञ वैद्यकीय अधिकारी टीम उपस्थित होती.
मंचावर उपस्थित मान्यवरांनी जनसमुदायला अवयव दान व मानसिक स्वास्थ्य याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सदर शिबिराचा लाभ १००० ते १५०० नागरिकांनी घेतला. तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विविध रोगांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधीचे वितरण करण्यात आले.