सोयाबिन शेतकरी बांधवांना आवाहन

0
836

सोयाबिन शेतकरी बांधवांना आवाहन

या वर्षी सोयाबिनचे उत्पन्न कमी असल्यामुळे बाजार भाव चांगले होते. परंतू मागील आठवड्यात कोरोणाची भिती दाखवून व्यापारी व तेल उत्पादक कंपन्यांनी सोयाबिनचे भाव ₹५००/- ते ₹७००/- रूपयाने पाडले. याचे नुकसान सर्व सोयाबिन उत्पादकांना भोगावे लागत आहे.
सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आपल्याकडे शिल्लक असलेले सोयाबिन एकाच वेळेस बाजारात विक्रीसाठी न आनता ५ टप्प्यात आनावे. उदा. आपल्या कडे १०० पोते सायाबिन शिल्लक असेल तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रूवारी, मार्च व एप्रिल या महिन्यात दर महिन्याला २० पोते या प्रमाणे बाजारात विक्रीसाठी आणावे. यामुळे आपल्याला भाव एव्हरेज करता येईल. व्यापारी व मिलवाल्यांना बाजार पाडून खरेदी करता येणार नाही. सोयाबिन प्रासेसर्स असोशीएशन व सरकारला पिक नेमके किती झाले याचा अंदाज येणार नाही व शेतकऱ्यांना चांगले दर मिळू शकतील. सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या साठवण क्षमते नुसार या पद्धतीचा अवलंब करावा व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे.
कृपया हा मॅसेज सर्व शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या व व्हाट्सॲप व फेसबुक वरील सर्व शेतकरी गृप्स वर शेअर करून आपल्या अन्नदात्याची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी मदत करावी. असे आवाहन चांदागढ शेतकरी उत्पादक कंपनी, राजुरा (मो. 9822409923 ; 9423401841) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here