नागभीड तालुक्यातील अनेक युवकांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश

0
440

नागभीड तालुक्यातील अनेक युवकांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱयांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागभीड शहर अध्यक्ष रियाजभाई शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे चिमुर विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे व सरचिटणीस संदीप डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहमीलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात नागभीड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वांचा वाढदिवस हा वेगवेगळ्या दिवशी असतांनाही आजचा दिवस ठरवुन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्नेहमीलनाचे आमंत्रण देऊन एकत्र करणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱयांचे मनापासून अभिनंदन केले. पक्ष बळकट करण्यासाठी सर्वांना कोणत्या ना कोणत्या कारणाने एकत्र आणण्याचा त्यांच्या प्रामाणिक हेतूला, प्रयत्नाला सलाम केला. अशा पदाधिकाऱयांमुळे नक्कीच पक्ष वाढीला बळकटी मिळते.

या कार्यक्रमात सभोवतालच्या गावातील अनेक युवकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला असुन त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणार असल्याची भावना सर्व युवकांनी व्यक्त केल्या.

सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सुजित उपरे विधानसभा अध्यक्ष रघुनाथ बोरकर, शहर अध्यक्ष रियाजभाई शेख, तालुकाध्यक्ष विनोद नवघडे, राजकुमार खोब्रागडे, माजी अध्यक्ष मंगेश सोनकुसरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष शाहरुख भाई शेख, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाई शेख, युवक जिल्हा उपाध्यक्ष सद्दाम शेख, सरचिटणीस संदीप डांगे, सिकंदर कास्तावार, महिला तालुकाध्यक्षा सौ. रेवतकर, महिला शहराध्यक्ष वनिता सोनकुसरे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here