चंद्रपूर जिल्हा महसूल विभागातील लिपिक व शिपायांची अनेक पदे रिक्त ?

0
601

चंद्रपूर जिल्हा महसूल विभागातील लिपिक व शिपायांची अनेक पदे रिक्त ?

चंद्रपूर, किरण घाटे – एकीकडे सुशिक्षित बेराेजगारांचे प्रमाण झपाट्याने वाढतच असतांनाच चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल विभागात गेल्या ब-याच वर्षापासून ८९पदे रिक्त असल्याची खात्रीलायक माहिती समाेर आली आहे .एव्हढेच नाही तर शासनाने ही पदे न भरल्यामुळे जिल्ह्यातील तालुक्यात अनेक कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांवर अतिरिक्त कामांचा भार दिल्या गेला आहे .ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे जेवढ्या वेगाने कामांना गती मिळावी तेवढी गती मिळत नाही . दरम्यान गेल्या दाेन वर्षापासून जगभरात पसरलेल्या काेराेना महासंकटात या विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग शासकीय सुट्टीच्या दिवसात इमाने इकबारे कार्यालयीन कामे हाता वेगळी करीत असल्याचे चित्र द्रूष्टीक्षेपात पडत आहे .महसुल विभागातील रिक्त पदात ७४सरळ सेवेची तथा पदाेन्नतीची १५पदे रिक्त असल्याचे समजते .ही पदे राज्य शासनाने भरावी जेणे करुन कार्यरत कर्मचा-यावरील अतिरिक्त कामांचा भार कमी हाेईल व काही अंशी सुशिक्षित बेराेजगारांचा प्रश्न सुटेल! जिल्ह्यातील या रिक्त पदात प्रामुख्याने महसुल सहाय्यकांची ३७तर शिपायांची ३३पदे अजुन ही रिक्त असल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here