किड व रोगाची आर्थिक नुकसान पातळी पाहून फवारणी करावी पंचायत समिती सदस्य श्री गंगाधर मडावी

0
344

किड व रोगाची आर्थिक नुकसान पातळी पाहून फवारणी करावी पंचायत समिती सदस्य श्री गंगाधर मडावी

कृषी विभाग मार्फत मौजा आष्ठा दि. ६ व ७/०८/२०२० दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे त्या मध्ये शेतमजूरांना कीटकनाशके फवरताना घ्यावयाची काळजी, कापुस पिकावरील किडींची ओळख व आर्थिक नुकसान पातळी, पिकांच्या वाढीनुसार फवारणीची योग्य वेळ, किटकनाशके वर्गवारी,व द्रावण करण्याची योग्य पध्दत, स्प्रे पंप निवड व निगा, आदी विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास सचिन डोगरे सिजेंटा प्रतिनिधी, सचिन मरस्कोल्हे युपिल प्रतिनिधी, श्री. टाले कृषि सहाय्यक गोंडपिंपरी, डॉ. तामगडे मडम यांनी कीटकनाशकामुंळे विषबाधा झाल्यास प्रथमोपचार व सुरक्षा सांधनांचा वापर , श्री प्रकाश कज्जबवार, यांनी दशपर्णी अर्क निंबोळी अर्क तयार करणे संबंधीमार्गदर्शक केले .कार्यक्रमाचे उद्घ़ाटन श्री. गगाधर मडावी, सदस्य पं.स. हरीष ढवस, सरपंच सुनिल ढवस ग्रापं सदस्य, प्रदिप दिवसे प्रगतशिल शेतकरी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एच.पी.कोहपरे, कृस सुत्रसंचालन श्री. के. एम.टोंंगलवार कृस व श्री एस. जी.कोसरे कृस यांनी केले. सदर कार्यक्रमावेळी प्रात्यक्षिक द्वारे फवारणी कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमास सुरक्षा किट वीस सुमिटोमो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मोफत करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री एम.के राठोड यांनी केले सदर कार्यक्रमाच्या आयोजनात श्री सोमदेव मोटगरे आत्मा प्रतिनिधी श्री. पी.डी.पाथरे, श्री एन.ए वाकुडकर व श्री जे.पी.दलाल आकाश वासमवार टाटा ट्रस्ट प्रतिनिधी यांनी विशेष भूमिका बजावली. सदर कार्यक्रमास श्री. सी.पी. निमोड ताकृअ पोंभूर्णा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here