सहजं सुचलं व्यासपीठा मुळे निश्चितचं माझे कलेला वाव मिळेल – मुंबईची सुपरिचित मेकअप आर्टीस्ट शितल काेसेची प्रतिक्रिया!

0
730

सहजं सुचलं व्यासपीठा मुळे निश्चितचं माझे कलेला वाव मिळेल – मुंबईची सुपरिचित मेकअप आर्टीस्ट शितल काेसेची प्रतिक्रिया!

मुंबई, किरण घाटे : महाराष्ट्रातील स्रियांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देणां-या सहजं सुचलं महिला व्यासपीठामुळे माझे कलेला अधिक वाव मिळेल अशी प्रतिक्रिया मुंबई नगरीच्या सुपरिचित मेकअप आर्टीस्ट शितल काेसे यांनी आज( शुक्रवारला )दुपारी भ्रमनध्वनी वरुन या प्रतिनिधीशी बाेलतांना व्यक्त केली .विदर्भातच नव्हे तर मुंबई , पुणे , औरंगाबाद , उस्मनाबाद येथे सहजं सुचलंचे नाव पाेहचले असल्याचे शितल काेसे बाेलतांना म्हणाल्या .या व्यासपीठावर अनेक कर्तबगार महिलांचा व नवाेदित तरुणींचा समावेश असल्याच्या त्या सांगण्यांस विसरल्या नाही .निश्चितच या व्यासपीठा मुळे माझे कलेत अधिक भर पडेल यात तिळमात्र शंका नाही .अश्या काेसे शेवटी म्हणाल्या .सदरहु सहजं सुचलंच्या (चारही ) व्यासपीठावर आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणां-या महाराष्ट्रातील सहाशे पेक्षा अधिक महिलांचा व युवतींचा समावेश आहे, हे विशेष!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here