बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविला, आदिवासी बांधवात उमटला नाराजीचा सुर !

0
575

बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविला, आदिवासी बांधवात उमटला नाराजीचा सुर !

प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करु ! नेते मंडळींनी दिला इशारा !

🔴🟡🟢🔴🟣🟢🟡🟣चंद्रपूर 🔴🟢किरण घाटे 🟡आदिवासी समाजाचे आराध्य दैवत व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिविर भगवान बिरसा मुंडा यांचा पुर्णाक्रूती पुतळा येथील स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील रेल्वे स्टेशन चाैकात उभा करण्यांत आला हाेता .परंतु दि. २७फेब्रुवारीला हा पुतळा कुठलीही पुर्व सुचना न देता कडक पाेलिस बंदाेबस्तात भल्या सकाळी महानगर पालिका प्रशासनाने हटविला त्यामुळे साहजिकचं आदिवासी बांधवात संतापाची लाट निर्माण झाली आहे.🟢🔴🟡🟣🟠🟤🔵🔴🟢🟣🟠एव्हढेच नाही तर प्रशासनाच्या या क्रूतिमुळे अख्खा आदिवासी बांधव व्यतीत झाला आहे . 🟠🔴🟢🟠🟣🟡🟤🔵🔴🟠🟡चंद्रपूर नगरीतील उपरोक्त पुतळा हटविल्याची बातमी कानावर पडताच जिल्ह्याभरातुन असंख्य आदिवासी बांधव शनिवार दि. ६मार्चला चंद्रपूरात दाखल हाेवून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बैठा सत्याग्रहाला आरंभ केला आहे .🔵🟢🔴🟣🟤🟠🟡🟢🔴🟢🔴दरम्यान या आंदाेलनात अशाेक तुमराम , जितेश कुळमेथे , नितेश बाेरकुटे , हितेश मडावी ,गणेश इसनकर, जमुना तुमराम ,जमिला मेश्राम , लता पाेरते , शांता मडावी आदिंनी भाग घेतला . ज्या ठिकाणाहुन बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविला त्याच ठिकाणी त्वरीत पुतळा उभा केला नाही तर हे आंदोलन असेच सुरु राहील असा इशारा आदिवासी बांधवानी दिला आहे .या आंदाेलनाला आता सर्वस्तरांवरुन प्रतिसाद मिळत असुन प्रशासनाने त्वरीत दखल न घेतल्यास आदिवासी बांधवाकडुन तीव्र आंदोलन हाेण्यांची शक्यता देखिल नाकारता येत नाही .🔴🟠🟡🟢🟣🔵🟤🔶🟢🔶🟣सुरु झालेल्या आंदाेलनाला शहरातील अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी भेटी दिल्या असल्याचे व्रूत्त आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here