विरुर पोलीस स्टेशन हद्दीत दारूविक्रेत्यांचा “माफिया राज”

0
355

विरुर पोलीस स्टेशन हद्दीत दारूविक्रेत्यांचा “माफिया राज”

पोलीस मित्राला जबर मारहाण ; आरोपी मात्र प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर मोकाट

राजुरा । अमोल राऊत, (13 ऑक्टोबर)

सध्या वीरुर स्टेशन पोलीस हद्दीत अवैध दारू वीक्रीला प्रोत्साहन मिळत असून दारू वीक्रेत्याने चक्क पोलीस मित्राला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
वीहीरगाव येथील पोलीस मित्र नामदेव जयराम बोन्डे याला मागील काही दिवसांपूर्वी त्याच गावातील अवैध दारू तस्कर आरोपी नितीन गुरमेट्टिवार याने जबर मारहाण केली. प्राप्त माहितीनुसार नामदेव बोन्डे हे आपल्या नातेवाहीकास बल्लारपूर येथून जेवणाचा डब्बा देऊन गावाकडील परत येत असतांना कोहपरा फाट्याजवळ थांबून असतांना अचानक आरोपी नितीन गुरमेट्टिवार हा आपल्या दुचाकिने घटणास्थळावर आला आणि नामदेव याला तू पोलिसांचा दलाल आहेस ,माझी दारू पकडून देणार काय ,तूझ्यात हिंमत असेल तर मला पकडून दाखव म्हणत मारहाण सुरु केली. अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वीरुर स्टेशन पोलीसात गुन्हा नोंद केला असून नामदेव यांच्या वैद्यकीय अहवालानुसार आरोपीवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. परंतु नामदेव यांना रक्त निघेपर्यंत आणि डोळ्याच्या खाली काळा डाग पडून गंभीर दुखापत होऊनही कुठलीही ठोस कार्यवाही न झाल्याने पोलीस मित्र चांगलेच घाबरलेले आहेत. एखाद्या दारू तस्कर माफिया कडून पोलीस मित्रांना मारहाण होत असेल आणि त्या माफीयावर कुठलीही कठोर कार्यवाही होत नसेल तर मात्र पोलीस मित्र म्हणून आपला जीव धोक्यात टाकून पोलीसांना सहकार्य करण्यावर आता शंका व्यक्त केली जात आहे. आरोपीवर कडक कार्यवाही न झाल्यामुळे पोलीस मित्र संघटना लवकरच जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक यांना भेटून सदर प्रकरणाची माहिती देऊन विहीरगाव येथील मोठ्या प्रमाणात सुरु असलेली दारू तस्करी आणि ती तस्करी थांबविंयात पोलीस प्रशासन कसे कमी पडत आहे यावर चर्चा करून निवेदन देणार आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक या प्रकरणाच्या अनुषंगाने वीरुर पोलीस स्टेशन हद्दीतील वाढती अवैध दारू तस्करी व माफिया राज वर अंकूश लावतील काय आणि ही दारू तस्करी मोठ्याप्रमात वाढत असतांना विहीरगाव येथील बीट जमादार यांची काय भूमिका आहे ते तपासतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विहीरगाव येथे मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होत असून नितीन गुरमेट्टिवार याच्या मार्फत दारू सप्लाय होत असल्याची माहिती समोर येत आहे. तरीही वीरुर स्टेशन पोलीसांना व बिट जमादराला हे दिसत नाही किंवा आरोपी हाती लागत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

—————————————-
पवार ,बिट जमादार ,वीहीरगाव

नामदेव बोन्डे हे आम्ह्चे पोलीस मित्र असून त्यांनी वेळोवेळी आम्हची मदत केली आहे. त्यांच्यावर दारू माफियाने केलेल्या हल्ल्यात जो वैद्यकीय अहवाल आला त्यानुसार आम्ही कार्यवाही केली आहे. प्रतिबंधात्मक कार्यवाही करून आरोपीचा शोध आम्ही घेतोय परंतु तो आम्हच्या हाती लागत नाही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here