औष्णिक विद्युत प्रकलपग्रस्त आंदोलनकर्त्यांना सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे समर्थन

0
516

औष्णिक विद्युत प्रकलपग्रस्त आंदोलनकर्त्यांना सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे समर्थन

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कुशल कृती समिती तर्फे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र चंद्रपुर च्या प्रकल्पग्रस्त जनेतेने विनाअट नौकरी वर रूजू करन्यासाठी पुकारलेला आंदोलन अविरतपणे शुरू आहे.
कोणतीही अट न घालता सरळ सेवेत समाविष्ट करन्यात यावे या प्रमुख मागणी करिता जवळपास ६०० पिडित औष्णिक विद्युत प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्ते बुधवार ०५ आॅगष्ट २०२० पासून चंद्रपुर CTPS Powerplant येथे आंदोलन करत आहेत. पैकी २ मुली व ५ मुलं अशी एकुण ७ आंदोलनकर्ते मागील ४ दिवसांपासून पॉवर हाउस च्या चिमनी वर चढलेले आहेत.
लोकशाही मार्गाने आपल्या न्यायीक मागणीसाठी संघर्ष करनाऱ्या या आंदोलनकर्त्यांची व्यथा ऐकन्यासाठी स्वतःला पुरोगामी सांगनाऱ्या कांग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उर्जामंत्री डाॅ. नितिन राऊत यांचेकडे मात्र वेळ नाही. उर्जामंत्री नितिन राऊत यांनी उलट आंदोलनकर्त्यांसमोरच अशी अट ठेवली आहे की अगोदर तुम्ही विद्युत चिमनी च्या खाली उतरा नंतर चर्चा करा अन्यथा तुमच्यासोबत मी चर्चा करनार नाही.
तथागत बुध्द व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मंत्री पदाची शपथ घेऊन उर्जामंत्री बनलेल्या नितिन राऊत यांची असंवेदनशिलता तसेच त्यांचा लोकशाही मुल्यांवरचा अविश्वास यानिमित्ताने दिसून येत आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलन या आंदोलनाची दखल घेत पाठिंबा दिलेला आहे.
आज ०९ आॅगष्ट २०२० रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग, चंद्रपूर शहर अध्यक्ष आशिष बोरेवार, कोषाध्यक्ष मयुर साखरे मीडिया प्रभारी प्रशिक खांडेकर व इतर पदाधिकारी यांनी आंदोलन स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन समर्थन पत्र आंदोलनकर्त्यांना सुपुर्द केले. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करन्याची तयारी सुध्दा सम्यक विद्यार्थी आंदोलन चा वतीने आंदोलनकर्त्यांना देन्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन व उर्जामंत्री नितिन राऊत यांनी तात्काळ या आंदोलनाची दखल घ्यावी व आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांना न्याय द्यावा, तसेच त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन करन्याच्या इशारा देन्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here