घुग्घुस शहरात काँग्रेस कमिटीतर्फे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल आतिषबाजी,जल्लोष साजरा

0
300

घुग्घुस शहरात काँग्रेस कमिटीतर्फे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल आतिषबाजी, जल्लोष साजरा

घुग्घुस येथे राज्याचे मा.मंत्री व जि.मा.पालकमंत्री तसेच ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांची महाविकास आघाडीच्या वतीने राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदी नियुक्ती झाल्याने घुग्घुस शहर काँग्रेस च्या वतीने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व मित्रपरिवार, पदाधिकाऱ्यांसह लाडू वाटप व फटाक्यांची आतिषबाजी करीत उत्साहात साजरा करण्यात आला.
अशा परिस्थितीत महागाई भरपूर वाढली या सरकाराला विरुद्ध सर्वसामान्यांचा बुलंद आवाज करण्यासाठी मा.मंत्री वडेट्टीवार यांच्या रुपात सक्षम नेत्यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड केल्याबद्दल काँग्रेस नेते राजुरेड्डी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस पदाधिकारी व महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here