आठवडी बाजार भरविण्यासाठी गावकऱ्यांचे ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन

0
632

आठवडी बाजार भरविण्यासाठी गावकऱ्यांचे ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन

 

कोरपना तालुक्यातील वडगाव या गावामधे नवनवीन योजना गावकरी मंडळी राबवत असतात त्यातच वडगाव या गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन गावात आठवडी बाजार भरण्यात यावा अशी चर्चा करत सरळ गावातील ग्रामपंचायत येथे ग्रामसेवकांना अर्ज करून गावात आठवडी बाजार सुरू करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना आणि गावात मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग असताना शेतकऱ्यांचा शेतात निघणाऱ्या भाजीपाल्याला गावातच रविवार या दिवशी आठवडी बाजार भरवून गावातच विकला जाईल आणि तरुणांना रोजगार देखील मिळेल या भावनेने गावतील तरुणांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत येथे निवेदन दिले आहे.

निवेदेन देताना गुलाब निमकर, रामचंद्र काकडे, सूरज गणफडे, महेश कोटरंगे, शुभम नोखाडे, स्वप्नील चौधरी, अभय कातकडे, अमोल ढवळे, सचिन सोनपितरे आणि मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here