गडचांदूरात गुरुवार पासुन चार दिवसांचा जनता कर्फ्यू

0
415

गडचांदूरात गुरुवार पासुन चार दिवसांचा जनता कर्फ्यू

गडचांदूर शहर व्यापारी असोसिएशन ने घेतला पुढाकार

गड़चांदूर प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना चे रुग्ण वाढत आहे व मृत्यू ची संख्या वाढत आहे त्यामुळे चंद्रपुर व बल्लारपूर येथे चार दिवसांचे व्यापारांनी व प्रशासनाने कडकडीत बंद पाळण्यात आले होते. शासन व प्रशासन ला सहकार्य म्हणून जनता कर्फ्यू चे आयोजन गडचांदूर शहर व्यापारी असोसिएशन ने केले आहे. गडचांदूर शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे शहरातील दोन प्रतिष्ठीत व्यक्ती कोरोना ने मृत्यू झाले आहे त्यामुळे संक्रमण व रुग्णाची संख्या कमी करण्यासाठी कोरोणा विषाणूची साकळी तोडणे गरजेचे आहे. हा उद्देश डोळ्या समोर ठेवून गडचांदूर शहरातील गडचांदूर शहर व्यापारी असोसिएशन ने गडचांदूर शहरात गुरुवार दि. 17 सप्टेंबर ते रविवार दि. 20 सप्टेंबर पर्यंत स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात गडचांदूर शहर व्यापारी असोसिएशन ने दि. 14 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी डॉ विशाखा शेळकी आणि गडचांदूर चे ठाणेदार गोपाल भारती यांना एक निवेदन सादर करून गडचांदूर व्यापारी असोसिएशन जनता कर्फ्यू पाळत असल्याचे अवगत केले. तसेच शासन व प्रशासनाला सहकार्य म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर जनता कर्फ्यू चार दिवसांचा असुन या कालावधीत सर्व दवाखाने, औषधांचे दुकाने, बॅंक व दुधवितरण व्यवस्था सुरु राहणार असून सर्व किराणा दुकान, भाजीपाला व फ्रूट चे दुकाने, पान टपरी, चाय चे दुकाने, फुटपाथवरील दुकाने व इतर सर्व दुकाने बंद राहणार आहे. तरी नगर परिषद गडचांदूर, गडचांदूर पोलीस स्टेशन व जनतेने या जनता कर्फ्यू ला यशस्वी करण्यासाठी कोरोना वायरस ची साखळी तोडण्यास सहकार्य करावे असे आवाहन गडचांदूर शहर व्यापारी असोसिएशन ने एका निवेदनातून केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here