वणीच्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
यवतमाळ, मनोज नवले
चंद्रकांत किसन मडावी (45) सुभाष चंद्र बोस चौकात हिवरकर यांच्याकडे भाड्याने राहत असत, कुर्ला घोन्सा मूळ रहिवासी असून यापूर्वी चिपळूण रत्नागिरी डेपोला चालक म्हणून काम करीत होते तीन वर्षांपूर्वी वणी येथे चालक म्हणून कार्यरत होते. मात्र एन दिवाळीचे तोंडावर राज्य सरकारने वेतन रोखल्याने घरची चूल पेटवायची कशी हाच खरा प्रश्न चंद्रकांत यांच्यावर उभा ठाकला होता मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर संपूर्ण महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक व चालक यांनी उपोषण सुरू केले गेल्या चार ते पाच दिवसांपासून चंद्रकांत घरी जेवण करत नव्हते काल जेवण न करता झोपले, सकाळी लवकर उठणारे लवकर न उठल्याने त्याना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रकृती अत्यंत खराब दिसून आली व त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात वनी येथे आणले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले . यांचा मृत्यू झाल्याने राज्य परिवहन महामंडळ वनीकरणासाठी नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
