चंद्रपूरचे भूतपूर्व आमदार अधिवक्ता एकनाथ साळवे कालवश !

0
457

चंद्रपूरचे भूतपूर्व आमदार अधिवक्ता एकनाथ साळवे कालवश !

मार्गदर्शक विचारांच्या पर्वाचा अंत झाला- आ. किशोर जोरगेवारांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

🟡🟣🔶चंद्रपूर🟡🟣किरण घाटे🔶🟣चंद्रपूरचे भूतपूर्व आमदार अधिवक्ता एकनाथ साळवे यांचे आज दुख:द निधन झाले .निधनाची बातमी कळताच राजकीय , सामाजिक , शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील अनेक मंडळींनी दुखवटा व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली.
🔶आ.किशाेर जाेरगेवारांनी वाहिली श्रध्दांजली !
समाजसेवक तथा माजी आ. अँड. एकनाथ साळवे यांनी कठीण काळात योग्य मार्गदर्शन करुन अनेकांना राजकीय व सामाजीक जिवनाात मार्ग दाखवण्याचे काम केले. राजकारणातील कठीण काळात मलाही त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या जाण्याने एक मार्गदर्शक हरपला असून मार्गदर्शक विचारांच्या पर्वाचा अंत झाला असल्याची शोकसंवेदना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.
माजी आ. एँड. एकनाथ साळवे यांनी नेहमी समाज प्रबोधनाचे काम केले. राजकारणातील समाजसेवक अशी त्यांची ओळख होती. 11 वर्ष त्यांनी चंद्रपूर विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्याकडे विचारांचा मोठा ठेवा होता. चंद्रपूरच्या विकासाबाबतची त्यांची तळमळ त्यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवायची. एनकाउंटर या कादंबरीतून त्यांनी आपले विचार व उपेक्षीतांचे वास्तव दर्शवीले. आज त्यांच्या जाण्याने एका विचारांच्या पर्वाचाही अंत झाला असून, कधीही भरुन न निघणारे सामाजीक व राजकीय नूकसान झाले असल्याचे या शोक संदेशात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here