नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भाजपा जिल्हा अध्यक्षांवर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी युवासेनेचे नायब तहसीलदारांना निवेदन
जिल्हा भाजपा अध्यक्षांची मुजोरी ; विना मास्क निवेदन देण्यासाठी थेट पोहचले तहसीलदार दालनात

वरोरा : शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी 2 नोव्हेंबर 2021 ला भाजपाचे वतीने आंदोलन करण्यात आले. भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या पुढाकाराने शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी तहसीलदारांच्या दालनात गेले असता, जिल्हाध्यक्षांच्या तोंडाला मास्क नसल्याने तहसीलदारांनी त्यांचे निवेदन स्वीकारले नाही.त्यानंतर भाजपाने तहसीलदार दालनासमोरच बैठा आंदोलन करून तहसीलदार निषेधाचे नारेही लावले.नंतर तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले .परंतु,26 ऑक्टोम्बर च्या शासनाचे गाईड लाइन नुसार नागरिकांनी मास्क लावावे अन्यथा प्रशासनाचे वतीने कार्यवाही करण्यात येईल असे नमूद असतांना जिल्हा भाजपा अध्यक्षांनी मास्क न लावता मुजोरीने निवेदन देण्यासाठी तहसीलदारांचे दालनात जाणे हा बेजबाबदारपणा नाही का? अशा बेजबाबदार व कोविड 19 च्या नियमांचे उलघन करणाऱ्या भाजपा जिल्हाध्यक्षावर दंडात्मक कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी युवासेना उपजिल्हा प्रमुख आलेख रट्टे यांनी नायब तहसीलदार काळे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कोविड 19 च्या नियमांचे पालन करण्यासाठी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी जनजागृती केली. केंद्र व राज्य शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे पालन सर्वसामान्य जनतेने केले. परंतु जिल्हा भाजप अध्यक्ष एकीकडे शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या सोडविण्यासाठी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरतात तर दुसरीकडे हेच जिल्हा भाजपा अध्यक्ष कोविड 19 च्या नियमांचे चक्क उलघन करतात. अशा मगरुर व मुजोरी करणाऱ्या भाजपा जिल्हाध्यक्षवर प्रशासनाने दंडात्मक कार्यवाही करावी. अशा आशयाचे निवेदन युवासेना उपजिल्हा प्रमुख आलेख रट्टे यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार काळे याना देण्यात आले आहे. निवेदन देतांना अमोल लोखंडे, पवन काळे, जगदीश वासेकर, अविनाश खंगार, वैभव गावस्कर, निलेश कुमरे यांची उपस्थिती होती.