लाइट्स मेटलच्या चित्र प्रदर्शनीस दोन शाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद

0
413

लाइट्स मेटलच्या चित्र प्रदर्शनीस दोन शाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद

लाइट्स मेटल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड, घुग्घुसच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थीचे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सरस्वती विद्या मंदिर म्हातारदेवी व श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली अंतर्गत प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या दोन शाळेत चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले.असून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात करण्यात आले.
प्रियदर्शिनी शाळेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात चित्र प्रदर्शनीस विद्यार्थिनींनी पर्यावरणावर आधारित एकापेक्षा एक सरस चित्र काढून घुग्घुस परिसरातील नागरिक, पालकाचे लक्ष्य वेधून घेतले.

कंपनीचे मानव संसाधन उपाध्यक्ष पवन मेश्राम तसेच शाळेचे प्रमुख पाहूणे यांनी विद्यार्थांना सांगितले की,प्राचीन काळापासूनच भारतीयांची चित्रकलेत रुची आहे. आधीच्या काळातील लोकांनी जुन्या गुहा, झाडे झुडपे, जंगल व खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र काढून आपल्या समोर ठेवले आहेत. काही चित्रकार आपल्या कलेच्या माध्यमातून शिकार करणारे पशू पक्षी बनवत असत. चित्रकला खूप छान कला आहे. चित्रकार या कलेच्या माध्यमातून जीवनाचे दर्शन घडवितो. जेव्हा मानव जंगलात जाऊन शिकार करतो तेव्हा कश्या प्रकारे त्या प्राण्याला त्रास होतो हे सर्व चित्रकार दाखवतो. असे केल्याने शिकार करणार्या शिकारी चे डोळे उघडतात व तो परत असे कृत्य करीत नाही.
आधीच्या काळात राजे लोक चित्रकारांना बोलवून राजदरबाराच्या भिंतींवर चित्र बनवत असत. त्या चित्रांमध्ये स्त्रिया नृत्य करताना दाखवल्या जायच्या, काही भिंतींवर प्रेम प्रसंगाची चित्रे सुद्धा काढली जायची. राजा चित्रकला करणार्या चित्रकार वर खुश होऊन त्याला बक्षिसे सुद्धा द्यायचा. प्राचीन काळापासून ते एकविसाव्या शतकापर्यंत चित्रकारांना सन्मानित केले जात आहे. त्यांच्या चित्रकलेची प्रशंसा केली जात आहे. आज आपल्या देशात सोबतच विदेशात देखील चित्रकारांना सन्मानित केजा जात आहे. जेव्हा चित्रकार कोणतेही चित्र बनवतो तेव्हा त्याला पूर्ण जिवंत करून टाकतो आणि आपण त्या चित्राला पाहताच लक्षात येते की या चित्रात कोणती तरी गोष्ट लपलेली आहे.

यावेळी आयोजित बक्षीस वितरण समारंभ अध्यक्षस्थानी कन्या शाळेचे प्राचार्य अनू खानझोडे, तर लाइट्स कंपनीचे प्रमुख पाहुणे मानव संसाधन उपाध्यक्ष पवन मेश्राम, सीएसआर व्यवस्थापक तरूण केशवानी,एच.आर.रतन मेडा, सुरक्षा अधिकारी सुशीलकुमार तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
चित्रप्रदर्शनीचा लाभ विद्यार्थींनी व घुग्घुसकरांनी घेतला.
कार्यक्रमाचे संचालन बलवंत विखार यांनी तर कु.गौरी पेंदाम यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here