मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या नेत्ररुग्णांची तुकडी सेवाग्राम येथून परतली

0
302

मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या नेत्ररुग्णांची तुकडी सेवाग्राम येथून परतली

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात बुधवार, २ ऑगस्ट रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या नेत्ररुग्णांची तुकडी सेवाग्राम येथून परतली.

रविवार, ३० जुलै रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथील प्रयास सभागृहात भव्य मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, चष्मेवाटप व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरातील मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी नेत्ररुग्णांची तुकडी सेवाग्रामला रवाना करण्यात आली होती.

तिथे शस्त्रक्रिया पार पडल्या नंतर नेत्ररुग्णांची तुकडी घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात परतली.
याप्रसंगी रुग्णांनी ना. सुधीर मुनगंटीवार, माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे आभार व्यक्त केले.

यावेळी भाजपाचे विवेक तिवारी, चिन्नाजी नलभोगा, गणेश कुटेमाटे, असगर खान, श्रीकांत बहादूर, पियुष भोंगळे, विनोद जंजर्ला, परिमल नांदे, विजय माथनकर, सुनंदा लिहीतकर, अजय लेंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here