अल्ट्राटेक द्वारे ४० युवकांना वाहन प्रशिक्षण

0
383

अल्ट्राटेक द्वारे ४० युवकांना वाहन प्रशिक्षण

 

आवाळपूर :- अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाउंडेशन, आवारपूर हे नजीकच्या गावांची सर्व स्तरावरील प्रगती व्हावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असते या वाढत्या लोकसंख्येमुळे बहुतांश युवक बेरोजगार असतात. त्यांना कुठेतरी आपल्या कौशल्यावरती रोजगार मिळावा याकरिता अल्ट्राटेक वेलफेअर फाऊंडेशन ने नजीकच्या गावातील ४० युवकांना वाहन प्रशिक्षण देण्याचे ठरविले. विशेष म्हणजे त्या ४० युवकामध्ये २ मुलींचा समावेश आहे.

चंद्रपूर ड्रायव्हिंग स्कूल, चंद्रपूर यांच्या सहाय्याने ४० युवकांना वाहन प्रशिक्षण देऊन त्यांना टी.आर परमनन्ट ड्रायव्हिंग फोर व्हीलर लायसन्स सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे. या प्रशिक्षक प्रशिक्षणाचा शुभारंभ अल्ट्राटेक सिमेंट वर्क्स चे युनिट हेड, पी.एस. श्रीराम, यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला सौदीप घोष, संदिप देशमुख, कर्नल दिपक डे, आनंद पाठक, प्रशिक्षक उत्तम काळे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला यशस्वीकरिता सचिन गोवारदिपे, संजय ठाकरे, देविदास मांदाळे यांनी अथक प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here